पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) परवा एक बातमी वाचली,कुणीतरी म्हणे सनी लेओनी ची कंडोम
ची जाहिरात पाहिल्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. हि बातमी ऐकल्यानंतर
लगेचच त्यावर कुत्सित हसणे, किंवा नाक मुरडणे या आपसूक लोकांच्या
चेहऱ्यावर उमटणार्या प्रतिक्रिया मी पहिल्या. मुळात बलात्कारासारख्या
विषयाला धरून आलेली कोणतीही प्रतिक्रिया किंवा कोणतीही बातमी नाक मुरडून
सोडून देण्यासारखी नाहीये, अस मला स्पष्टपणे वाटत.
निर्भया प्रकारानंतर इतक मोठ जन आंदोलन उभ राहिलं,किती मेणबत्या पेटवण्यात आल्या,किती पाय घरातून बाहेर पडले. वाटल हि खूप मोठ्या बदलाची सुरुवात आहे, आता आपला देश या गोष्टी खपवून घेणार नाही.पण खरच अस झाल का ? असा माझ्या मनालाच मी जेंव्हा प्रश्न विचारतो तेंव्हा मोठ्च्या मोठ नाही अस उत्तर येत. हे बलात्कार का होतात हा प्रश्न नेहमी मला सतावत असतो. मी अनेकदा याच्या मुळापर्यंत जाऊन विचार करण्याचा प्रयत्न केला. अनेकांशी चर्चा केली. अनेकदा वादही झाले. वासनेने झपाटलेला नरदेह स्त्रीदेहाच्या अब्रूची लख्तरे वेशीवर टाकून सताड फिरतो आणि आपण शंढ असल्यासारखे पाहत राहतो.निर्भया प्रकरणावर बनलेली एक डॉक्युमेट्री पहिली. सरकारने या डॉक्युमेंटरी वर बंदी घातली आहे. ती पाहिल्यानंतर कुठेतरी काहीतरी गडबड आहे,काहीतरी निसटतय हातातून अस वांवर जाणवलं.एक आरोपी आपल्या बचावासाठी वाट्टेल ती विधाने करणार हे ठाऊक होते,पण ती जि काही विधाने होती त्यात कुठेतरी काहीतरी आहे ज्याकडे दुर्लक्ष होतंय अस वारंवार वाटत होत.
मी तरुणांची यावर मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.अनेक मुलांनी मुलींच्या कपड्यांना दोषी ठरवले तर मुलीनी मुलांच्या मानसिकतेला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले.वासानाधीनता हि बलात्कारापुर्तीच मर्यादित असू शकते हे मला वारंवार वाटत होत,पण मुळ प्रश्न सतावत होता कि बलात्कारानंतर जि विकृती स्त्री शरीराचे लचके तोडतीये तिच्या मागच नेमक कारण काय? हा इतका सारा गोंधळ आणि गुंतागुंत. आम्ही काहीही घालू तुम्ही तुमची बघण्याची नजर सुधारा असा सल्ला वारंवार कानावर येत असतो. यात तथ्यही आहे,पण ते किती हे ही एकदा तपासून पाहायला हवे. काहीही म्हणजे नेमक काय आणि किती याला कुठेतरी थोडी मर्यादा असायला हवी न. निसर्गाने पुरुष देहाची जि रचना केली ती कणखर,ओबड धोबड,किंवा म्हणायलाच गेलो तर रांगडी. तर स्त्री देह घडवला तो नाजूक,आकर्षक. आता कित्येकजण म्हणतील कि हि तुमची बघण्याची दृष्टी झाली.पण किती जरी अस म्हणालो तरी नर आणि मादी या दोन संकल्पनेतूनच निसर्गचक्र चालू आहे. नर हा मादीकडे आकार्षित होणार, याचा अर्थ असा नाही कि तो दिसेल त्या स्त्री ला वासनेचा शिकार बनवेन. शरीराच्या वासनेपेक्षा मानसिक वासना या सार्याला कुठेतरी जबाबदार आहे, आणि हि मानसिक वासना निर्माण होतीये ती वारंवार समोर येणाऱ्या अश्लील दृश्यांमुळे. मग ती सिनेमामध्ये प्रदर्शित होणारी असतील किंवा दूरदर्शन वर झळकणारी किंवा नेट च्या माध्यमातून सर्वांसाठी खुल्या असणार्या अश्लील चित्रफिती.या माध्यमातून निर्माण होणारी मानसिक वासना हि प्रत्यक्षात शारीरिक वासनेत रुपांतर करून बलात्कारात परिवर्तीत होते.हि झाली एक बाजू .
दुसरी गोष्ट यामागे मला जाणवली ती पुरुषप्रधान मानसिकता. पूर्वापार प्रत्येक क्षेत्रात आमचे वर्चस्व होते,स्त्रिया फक्त चूल आणि मुल सांभाळण्यासाठी होत्या आता या आमच्या कामात का ढवळा ढवळ करतायेत हि हेकेखोर वृत्ती.पुरुषांसारखे कपडे घालून या स्वतःला मोठ्या कोण समजतात.हि जि विघातक मानसिकता आहे हि देखील थोडीफार प्रमाणात का होईना या सार्याला कारणीभूत आहे.
तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट.बहुतांश स्त्रियांना हि पटणार नाही आणि बहुतांश स्त्रियांना हि नक्की पटेल. धोका,विश्वासघात,प्रेमभंग आणि यातून निर्माण होणारी चीड. जि त्या ठराविक स्त्रीपुर्ती मर्यादित न राहता संपूर्ण स्त्री जातीबद्दल तयार होऊन पराकोटीचा द्वेष निर्माण होतो. आणि यातून जन्म घेते ती बालात्कारानंतरची विक्रुती जि स्त्री शरीराचे लचके तोडते. आजकाल आपल्या जोडीदाराबद्दल असणारी निष्ठा खूप कमी प्रमाणात आढळते.माझा निर्णय घ्यायला मी स्वतंत्र आहे. यातून हवा तेंव्हा नव्या जोडीदाराच्या प्रेमात पडणे.त्याच्याशी शरीर संबंध ठेवणे. हे फक्त स्त्रीच नाही तर पुरुषानाही लागू पडते. यातून एकंदर द्वेषाची भावना निर्माण होते जिच फलित राग,चीड,घृणा, आणि पराकोटीची विकृती यातून दिसते. मुळात आता बलात्कार हा वासनेपुरता मर्यादित राहिला नसून तो एकंदर अहंकार,क्रोध,विकृती,या साऱ्यांतून निर्माण होणारा जटील प्रश्न बनत चाललाय आणि तो समाजासमोर आ वासून उभा आहे.
या प्रश्नाच्या विळख्यातून सुटण्यासाठी समाजाच प्रबोधन जितक महत्वाच आहे तितकाच कायद्याचा धाकही असण गरजेच आहे,
नाहीतर हा महाकाय अहंकारित हत्तीरूपी बलाचा चित्कार किती अब्रूची लख्तरे पायदळी तुडवेन याच उत्तर काळच देऊ शकतो...
-अभिनव बजरंग बसवर
एम.आय.टी इंटरनेशनल स्कूल अॉफ ब्रॉडकास्टिंग अँड जर्नलिझम, लोणी पुणे...
एम.आय.टी इंटरनेशनल स्कूल अॉफ ब्रॉडकास्टिंग अँड जर्नलिझम, लोणी पुणे...