सातारा (पुणे सुपरफास्ट न्युज): महाराष्ट्र भूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे
प्रतिष्ठानच्या वतीने शाहीर फरांदे यांच्या नावाने दिला जाणारा यंदाचा
‘शाहीर फरांदे’ पुरस्कार माजी खासदार प्रतापराव भोसले यांना समारंभपूर्वक
प्रदान केला जाणार आहे.भुर्इंज ग्रामपंचायत सदस्य ते महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेसचे अध्यक्ष पदापर्यंतची त्यांची दिमाखदार वाटचाल सर्वश्रूत आहे.
शाहीर फरांदव प्रतापराव भोसले यांच्या स्नेहाचे प्रतीक म्हणून हा पुरस्कार
सातारा येथे समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. यापूर्वी हा मानांकित
पुरस्कार दिवंगत राजारामबापू फाळके, डॉ. एन. डी. पाटील, शाहीर साबळे,
नागनाथ अण्णा नायकवडी, हरी नरके, सुधाकर गणगणे, डॉ. शालिनीताई पाटील, विजय
बोरावके यांना प्रदान करण्यात आलेला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव
वैभव फरांदे यांनी दिली. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष माजी नगरसेविका
सुनीता फरांदे, शाही प्रकाश फरांदे उपस्थित होते. ( प्रतिनिधी - निखिल
जगताप )