अहमदनगर ( पुणे सुपरफास्ट न्युज )  - 'आरक्षणाचे जनक' राजर्षी शाहू महाराजांचे वडिल चौथे शिवाजी महाराज यांची  अहमदनगर येथे असणाऱ्या समाधीवर अहमदनगर येथील शेकडो इतिहासप्रेमींनी  दिपोत्सव साजरा केला .आरक्षणाच्या उपकाराची जाणीव म्हणून दरवर्षी मंडळाचे सतीश सातपुते सर व रोहित वाळके यांच्या  संकल्पनेतून या कार्यक्रमाचे  आयोजन केले जाते .संध्याकाळी साडेचार वाजता सर्व सदस्यांनी  मिळून समाधी स्थळाची स्वच्छता केली आणि  त्यांनंतर पुतळा व समाधीला स्नान घालून दिपोत्सव साजरा केला ,या वेळी  इंजी.अभिजीत एकनाथ वाघ, डॉ.बाळ पवार, कॉम्रेड अविनाश साठे,इतिहासप्रेमी मंडळाचे असिफखान दुलेखान,दत्ताभाऊ वडवणीकर,आशिष सावंत,संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे, साप्ताहिक विजयमार्गचे संपादक अतुल लहारे,मखदुम परिवाराचे राजुभाई शेख,फिरोजभाई शेख,नादिरभाई,अनिल माळी व कॉम्रेड भैरवनाथ आदींनी सहभाग घेतला.
 
Top