आमचे प्रतिनिधी विनय गुरव यांच्या भटकंतीचा अनुभव त्यांच्याच शब्दात......



  पुरंदर तालुक्यातील माळशिरस मधील मी.गावापासुन जवळच ऐतिहासिक शिल्प कलेचा वारसा लाभलेलं भुलेश्वर मंदिर व तेथेच आदिलशाही सरदार मुरार जोगदेव याने पुण्याच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ले दौलत मंगळ व वारसा हक्कान मिळालेली भुलेश्वराची पुजा करण्याची संधी. व लहानपना पासुन असणारा छायाचित्रणाचा छंद ( कालांतराणे छायाचित्रण हाच जोडधंदा ) यामुळे लहानपना पासुनच गडकिल्ले ऐतिहासिक स्थळांची भटकंती करण्याची मनामध्ये आवड निर्माण झालेली जस जमेल तस चार दोन मित्र घेवुन भटकंती करायचो पन जवळपासच जास्त दुर जायला जमायच नाही.
                फेसबुक या सोशल मिडियाच्या माध्यमातुन बारामती येथील छायाचित्रकार व सह्याद्री ट्रेकर्स या संस्थेचे संस्थापक फैयाज शेख यांचे सोबत जुन २०१४ मध्ये ओळख झाली. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांनी फेसबुक या सोशल मिडियावर त्यांच्या राजगड ट्रेक चे फोटो अपलोड केले व तेव्हा मला समजले कि फैयाज शेख हे अशा प्रकारच्या निसर्ग सहलींचे आयोजन करतात . मी लगेचच त्यांना मला तुमच्या पुढिल सहलीचे नियोजन  मला कळवा असे सांगीतले . पुढे डिसेंबर २०१४ मध्ये नियोजन झाले स्थळ हरिश्चंद्रगड पहिल्या दिवशी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असणा-या खिरेश्वर टोलार खिंड मार्गे आम्ही भटकंतीला सुरवात केली. पुढे गणेश गुहेत दुपारचे जेवन करुण कोकणकड्याच्या दिशेने निघालो. सुर्यास्ता पाहुन तंबुत झोपलो . दुस-या दिवशी जवळच असणा-या तारामतीच्या डोंगरावर जायचे होते. दुस-या दिवशी सकाळी उठुन तारामती च्या दिशेने चालायला सुरवात केली पन पहिलाच ट्रेक असल्याने पायाने साथ दिली नाही. मी व काही मित्र मध्येच थांबलो पन निश्चय केला कि पुढच्या वेळेला आलो की तारामतीच्या डोंगरावर जायचेच . दिनांक १४ व १५ नोव्हेंबर २०१५ रोजी हरिश्चंद्रगड सहलीचे पुन्हा नियोजन झाले . दिनांक १४ नोव्हेंबर ला मध्यरात्री १२ वा. बारामती येथुन प्रवासाला सुरवात केली . रात्रभर प्रवास करुण सकाळी ८ वाजता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असणा-या पाचनई गावात पोहचलो.चहा नाष्टा करुण आम्ही सकाळी ९:३० मिनिटांनी गड चढाईला सुरवात केली सभोतालच्या निसर्गाचा आनंद  घेत , माहिती घेत २ तासा नंतर आम्ही सर्व एका कड्या जवळ पोहचलो त्या  ठिकाणी सर्वांनी नीबू सरबत प्यालो व सर्वांनी थोडा वेळ विश्रात्नी घेतली परत पुढच्या भटकंतीला सुरुवात केली व दीड  १ वाजून ३० मिनिटांनी आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ पोहचलो हरिश्चंद्रे मंदिराचे दर्शन घेवून गणेश गुहेत दुपारचे जेवण केले व त्यच ठिकाणी थोडा वेळ विश्रांती केली ३.३० मिनिटांनी कोकण कड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली ४.३० वाजता कोकण कड्यावर पोहचलो  व पुढी विश्रांतीसाठी तंबू ठोकले या वेळी अचानक फैयाज शेख यांचे फेसबुक वरील या साहिलीचे नियोजन पाहून खास आम्हला भेटायला आलेले ओतूर येथील  रवींद्र हांडे आम्हला येवून अचानक भेटले त्या नंतर कॅम्प फायर करून २ तास चर्चा सत्र चांगलेच रंगले या वेळेस रवींद्र हांडे यांनी सांगितलेल्या कॉलेज जीवनातील काही आठवणी पोठ धरून हसविणार्या होत्या  तर काहींनी आमच्या सोभात असणार्या चीमुलाक्या साराचे कौतुक लेले कारण काही जन चोकलेट खाऊन त्याचे कागद निसर्गात  कोठेही टाकत होते व ते कागद सात वर्षाची चिमुकली सारा उचलत होती जेव्हा कागद टाकणार्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी विचारले असता तिने  सहजच उत्तर दिले की हे कागद कुजत नाहीत व या निसर्गातील प्राणी किवां पक्षाच्या पोठात गेले तर ते त्यांना त्रास दायक ठरतात तेव्हापासून पुडे आप-आपला कचरा आप-आपल्या खिश्यात ठेवला पुढे रात्री चे जेवण करून थोडा वेळ नाच गाणे केले व प्रत्येक जन आप-आपल्या तंबूत जोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सोबत आणलेला दिवाळीचा फराळ बिस्कीट पुडे सर्वांचे एकत्र करून सर्वांनी एकत्र नाश्ता केला व  चहा पिऊन तारामतीच्या दिशेने कूच केली वाटेत जाताना एका खडकावर पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप एका खडकावर सकाळच्या कोवळ्या उन्हात बसलेला दिसला निसर्ग मित्र सचिन जानराव व फैयाज शेख यांनी सर्वाना या साप बद्दल माहिती दिली व त्याचे काही फोटो काडल्या नंतर त्याला त्याच परिसरात मुक्त करून आम्ही पुढे निघालो पुढे जाताना आमच्या पैकी काहीजण थकले होते या सर्वाना मनोधर्य देत व त्यांच्या बरोबर गप्पा मारत सर्व टीम लीडर पुढे चालले होते तारामतीला पोहचल्या नंतर याच परिसरातील रहिवासी असणारे रवींद्र हांडे यांनी सभोताल्च्या परिसराची माहिती दिली  ,,, सतत मनात वाटायचे  सह्याद्र ट्रेकर्स संस्थेच्या माध्यमातुन जनमाणसात निसर्गाविषयी जनजागृती करणे, निसर्गाविषयी आवड निर्माण करणे , तसेच निसर्गातील विविध प्राणी , पक्षी व नैसर्गिक संपत्ती याविषयी मार्गदर्शन करुन त्यांचे महत्व पटवुन देवुन संरक्षण करणे.व निसर्ग व त्यातील काही अंधश्रध्दा या विषयी जनजागृती करणे.अशी विविध सामाजिक कार्य करणार्या फैयाज शेख यांचा निसर्गाच्या सानिध्यात गौरव व्हावा या साठी मि घरातून निघताना एक फेटा घेतला होता तारामतीच्या डोंगरावर सर्व सदश्याना एकत्र घेवून सर्वांना विचारले की बारामती ते तारामती हा प्रवास व यातील काही सुखद अनुभव आपणास केवळ सह्याद्री ट्रेकर्स या संस्थेमार्फत मिळाले म्हणून या संस्थेच्या संस्थापकांचा सर्वांच्या वतीने मि सत्कार करू का टो पर्यंत कोणालाही माहित नव्हते की सह्याद्री ट्रेकर्सच्या उत्कुर्ष्ट नियोजनाबद्दल मि फैयाज शेख यांचा सत्कार करणार आहे सर्वांनी होकार देत एकच जल्लोष केला व आ आवाज कोणाचा सह्याद्री ट्रेकर्सचा नारा आशा गोशानानी हरीशचंद्र गडाचा परिसरआनंदी मय झाला
    अचानक झालेल्या सत्काराने फैयाज सर भारावून गेले व त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि काही क्षणात आमचा बारामती परतीचा प्रवास सुरु झाला - विनय गुरव , मु,पो-माळशिरस ता-पुरंदर जि-पुणे 
                                                                        
 
Top