पुरंदरच्या देवालयांच्या गावात मोठ्या प्रमाणावर महासुलचा गोंधळ 
महसूल केवळ खाजगी वसूल प्रमाणे वागल्याने तालुक्यात जमीन माफियांचे पेव 

पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पुरंदरच्या जेजुरी अर्थात मल्हार नगरीमध्ये व तालुक्यातील प्रमुख देवालयांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी व विक्रीचा फंडा चालू असून महसूल विभागाच्या आर्थिक प्रलोभनामुळे नोंदीही मलईच्या नशेवर बिंनधास्त केल्या जात असल्याने पुरंदरच्या देवदेवालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय व शेतकरी नसल्यानेही क्षेत्रे नावे नोंद झाल्याने सर्वच देवालये विळख्यात अडकल्याचे चित्र आहे .
पुरंदर तालुक्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी हे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांच्या विळख्यात अडकले आहे , त्यामुळे भविष्यात अठरापगडजातींच  आणि बाराबलुतेदारांच कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणार्या मल्हार नगरीस रहिवाशी व मालक या वृत्तीने हळूहळू परप्रांतीयांचा चांगलाच विळखा वाढणार आहे , याकडे महसूल विभागाने  आर्थिक लाभामुळे मात्र दुर्लक्ष्य केल्याने पैशाचा बाजार होऊन शेतकरी नसतानाही शेतीच्या व्यवाहारच्या नोंदी बिनदास्त करण्यात आल्याने स्थानिकांकडून या बाबत नाराजी व्यक्त केली जातेय .
पुरंदर तालुक्यातील नारायणपूर ,दत्तमंदिर, बालाजी मंदिर,भूलेश्वर, श्री नाथ म्हस्कोबा, महर्षी वाल्मिकी समाधी अशा तीर्थक्षेत्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खरेदीविक्रीचे व्यवहार पार पडले , त्यामध्ये अनेक  ठिकाणी तर बोगस मालक उभे करूनही व्यवहार झाले ते काही अंशी उघडही झाले तरीही केवळ लोभापाई आजही मोठ्या प्रमाणावर कोणतीच खबरदारी घेतली जात नसल्याने पाकिस्तानातील व्यक्तीही येथे जमीन खरेदी करू शकतो असा प्रकार होत आहे.कोणीही या जमीन खरेदी करा व बिनदास्त राहा असाच प्रकार या परिसरात चालू असून बळीराजा हा भूमिहीन बनून शेतात राबणारा गडी बनू लागला आहे , आज लाखो भाकीकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवालयांच्या गावातच हा प्रकार होत असताना मात्र शासकीय अधिकारी पळवाटा काढून बक्कळ पैसा कमविण्याच्या फंदात असल्याने भविष्यातील सुरक्षितता हरवली जात असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते किशोर खळदकर यांनी व्यक्त केले .
बळीराजाचा  देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात परदेशीसह विना ओळखीच्या लोकांची संख्या वाढत असून हजारो हेक्टर क्षेत्र ही शेतकरी नसतानाही बिगरशेती करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर होत असल्याने भविष्यात शेती राहणार का असा ही प्रश्न निर्माण होत आहे. तर राज्या शासनाच्या तुकडा बंदीच्या कायद्याला लगाम घालण्याच्या कृत्यामुळे ही जमीन माफियांच्या टोळ्याच्या हातातच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचे भवितव्य जाणार असल्याचे चित्र आहे. पुरंदर तालुक्यातील मल्हार नगरीच्या महसूल सर्कल मध्ये किमान जेजुरी २३९, कोळविहरे १९, नाझरे सुपे 3 ,नाझरे क.प १९, कोथळे १८ , दौंडज 13 , धालेवाडी १० , पिंगोरी 4 , राख 5 ह्या नोंदी शेतकरी नसलेल्या व्यक्तींनी जमिनी खरेदी केल्या असून त्या नोंदीही ग्राह्य धरण्यात आल्या आहेत अशी चर्चा महसूल विभागातील कर्मचारीच  खाजगीरित्या करत आहेत, वरील सर्व नोंदी ह्या शासनाच्या दप्तरी आहेतच मात्र काही नोंदी ह्या पळवाटा काढून ही नोंदवल्याणे येथील बळीराजाच्या शेतशिवारात भविष्यात दारूचे कंपन्याचे की इमारतीचे पिक उगविणार हे कोणीच सांगू शकत नाही .
   शासनाने जमीन खरेदी विक्री करणे व त्यामधील अटी पाळणे हे बंधनकारक असतानाही केवळ पैशाच्या लोभापाई महसूल विभाग हा खाजगीरित्या वसूल गोळा करीत असल्याने आज महसूल चा सातबारा व त्यांच्या फेरफार नोंदीही दवडी करणे गरजेचे आहे , बकाललेल्या वस्त्याचे वाढते पेव व वाढती गुन्हेगारी यामुळे आज या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांचे प्रमाण वाढत असून वेळीच लगाम घालण्यासाठी नव्याने होणार्या खरेदी विक्रीच्या नोंदी ह्या केवळ पत्रकावर न राहता त्यामधील बंधने पाळणे गरजेचे आहे.



जेजुरी मंडलाची तहसीलदारांकडून तपासणी?
जेजुरी मंडल अंतर्गत अनेक चुकीचे प्रकार होत असल्याची तक्रार पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी लगेचच जेजुरी मंडलची दप्तर तपासणी केली असता , याचा राग मनात धरून मंडलधीकार्यानी तालुक्यातील सगळे तलाठी ,आणि मंडल अधिकारी यांना एकत्र करून तहसीलदर संजय पाटील यांच्या विरोधात लाक्षणिक बंड केले होते मात्र प्रांतधिकारी समीर शिंगटे  यांनी मध्यस्थी करत ते प्रकरण मिटवले होते .


दहशतवादीही घेऊ शकतो मल्हारनगरीत मालमत्ता?
महासुलचा भोंगळ कारभार पाहता सिने अभिनेता अभिताब बच्चन यानाही शेतकरी नसल्याच्या दाखल्याने न्यायालयाने फटकारले होते मात्र जेजुरीच्या मल्हारनगरीत, परिसरात केवळ महसूलच्या आर्थिक लोभाने शेकडो शेतीच्या नोंदी ह्या बिनधास्त करण्यात आल्या आहेत , ओळखपत्राच्या बाबतीत अनेक खोटे प्रकार उघड झाले असताना देखील , ओळखपत्र  ही पहिले जात असल्याने उद्या दहशदवादी ही येथे मालमत्ता घेऊन बिनधास्त राहू शकतो हे मात्र नक्की त्यामुळ येथील पुर्वीच्य सर्व नोंदी तपासाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.  ( प्रतिनिधी – प्रकाश पवार )


 
Top