पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - तुम्ही वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवत असाल तर सावधान! तो अगदी सहजपणे चोरीला जाऊ शकतो. पुण्यामध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या अश्याच भामट्यांना कोंढवा पोलीसांनी अटक केलीय. त्यांच्याकडून जवळ पास दहा लाख रुपयांचे तब्बल १०६ मोबाईल हस्तगत करण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व स्मार्ट फोन आहेत.
कशी केली मोबाईल चोरी?
पुण्यातल्या मंडई, लक्ष्मी रोड या गर्दीच्या ठिकाणाहून चार जणांनी हे मोबाईल चोरले होते. फक्त दिवाळीच्या दरम्यान या चार भूरट्यानी १०६ मोबाईलवर डल्ला मारला. प्रदीप बेटकरी, अनिल बेटकरी, किरण वडार, मारुती बेटकरी अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत. हे चार जण अत्यंत कल्पकतेने मोबाईल चोरी करायचे. चार जणांतला एक जण सावजाला बोलण्यात गुंतवायचा आणि दुसरा मोबाईल चोरी करायचा तर बाकीचे गाडी वर तयार राहायचे. चोरी केली की ते पसार व्हायचे. कोंढवा पोलीसांनी अखेर त्यांना अटक केलीय.
मोबाईल चोरीला गेला की आशाच सोडून दिली जाते. पण मोबाईल परत मिळाल्यामुळे बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
या चार जणांबरोबर आणखी या चोऱ्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. चोरीचे मोबाईल कोण खरेदी करत होतं याचाही पोलीस शोध घेत आहेत.