.
पिंपरी -चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - शिर्डी येथील एका बिअर शॉपी मध्ये सागर शेजवळ या तरूणाचा खुन करण्यात आला होता. या खुन प्रकरणातील फरार आरोपीस भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई काल शनिवारी दुपारच्या सुमारास दापोडी येथे करण्यात आली. किरण अर्जून आसबे (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे या खूनप्रकरणी अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह धनंजय प्रकाश काळे (रा. कोपर गाव, जि. अहमदनगर) व एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिन्यांपुर्वी
6 मे रोजी शिर्डी येथे एका बिअर शॉपीमध्ये सागर शेजवळ बसला होता. त्यावेळी काही तरुणही तेथे बसले होते. यावेळी सागरला फोन आला. त्याच्या मोबाईलवर भीम गीताची रिंगटोन होती. या रिंगटोनमुळे ते तरुण चिडले व त्यांनी सागर याला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी सागर याला एका वाहनात टाकून शिंगवे रुई शिवारात नेले व तेथेही त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा म़त्यू झाला होता. या खुन प्रकरणातील सर्व आरोपी फरार झाले होते. या खुनामुळे संतप्त संघटनांनी पोलीस यंत्रणेला धारेवर धरले होते. पोलिसांनी बिअर शॉपीमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघांना अटक केली होती.
भोसरी पोलिसांनी काल दुपारी दापोडी रेल्वे स्टेशन परिसरातून चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार किरण व धनंजय तसेच एका अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी किरण आसबे याने शिर्डी येथील सागर शेजवळ खुनप्रकऱणात सहभागी असल्याची कबूली पोलिसांकडे दिली. तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ( प्रतिनिधी - केडी पाटीलसर )