हे लय खतरनाक कारट आहे....

अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा काल ६७वा जन्मदिवस , या निमित्ताने काल त्यांची भेट घेण्याकरता कुंभारवळण येथील अनाथआश्रमात गेलो ,खरतर "मी सिंधुताई सपकाळ बोलतेय" हा सिनेमा असेल , "मी वनवासी" नावाचे त्यांचे आत्मचरित्र असेल तसेच त्यांची वेगवेगळ्या मुलाखती ,व्याख्याने  या माध्यमातून त्याचं जीवनचरित्र , त्यांच्या संघर्षाची कहाणी  मला काही प्रमाणात का होईना पण माहित होती, माईंना मी  प्रत्यक्षात कधीच भेटलो नव्हतो , काल पहिल्यांदाच त्यांना भेटण्याचा योग आला , माईंशी आदल्या दिवशी फोनवर बोललो होतोच त्यानुसार त्यांनी वेळ दिला, त्यांच्याशी मनसोक्त बातचीत मला करायची होती, मनात काहीच नव्हते पण जे काही वाटेल ते त्यांना विचारायचे होते , "महाराष्ट्रभूषण पुरस्कारच्या वादावरून ते दाभोळकर पानसरे यांच्या हत्येपर्यंत.., सिनेमापासून  ते समाजातील उपेक्षित , वंचितांच्या प्रश्नान्पर्यंत" एकूणच काय तर प्रत्येकविषयवार माईंशी बोलत होतो , त्या सुद्धा  कोणतीही आडकाठी न ठेवता , थेट पने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी मनसोक्त देत होत्या , शेवट समारोप करीत असतना मी माईंना म्हणल की तुमचा आजचा लाख-मोलाचा वेळ तुम्ही मला दिला तरी मी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही किवा आपले आभार सुद्धा मानणार नाही आणि या पाठीमागचे कारण ज्यावेळी सांगितले त्या वेळी माई मोठ्याने म्हणाल्या " हे कारट लय खतरनाक आहे.....नंतर मला त्यांनी जवळ घेतले , मायेने गालावर हात फिरवला आणि माझ नाव,गाव ,मी काय करतो तिथपासून बरच काही विचारले आणि  शुभेछा देण्यासाठी आलेल्या लोकांना माईंनी सांगितलं "हे पोरग लय पोचल्याल हाय ,हे  सगळ्यांची बोलती बंद करणार हाय "  मला तुला परत भेटायचे आहे , मांजरीला ये , नाही आलास तर मी आहेच बेटा..तू खूप मोठा होणार आहेस...आणि मी म्हणते ते खर होत.....माई बोलत होत्या मी ऐकत होतो...खरच खूप बर वाटल....., समाजात अशा हजारो सिंधुताई जन्माला येवोत असे जरी आपण म्हणालो तर तेवढिच अनाथांची संख्याही वाढेल ,पण तरीही अनाथांच्या पायी दीप लावण्यासाठी अशा सिंधुताइंची समाजाला गरज आहे ,अशी ६७चकाय हजारो वर्षे माइंना लाभावीत..ह्याच जन्मदिनाच्या खूप खूप शुभेछा.....

- निलेश दिलीप जगताप
( संपादक , पुणे सुपरफास्ट न्युज ) 
 
Top