वाल्हे ( पुणे सुपरफास्ट न्युज )  - आज पर्यंत या देशातील शेतकर्यांनी शेती ही परंपरा म्हणून केली ,पण येणाऱ्या काळात शेती धंदा , व्यवसाय म्हणून जर केली नाही तर शेतकऱ्यांच्या सद्यपरीस्थितीत कसलाही बदल होणार नाही, बळीराजाचा अंश असणार्या या देशातला आजचा बळीराजा रोजच मरतोय , आत्महत्या करतोय ,देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जेवढ्या जवानांनी बलिदान दिले नाही त्या पेक्षा जास्त शेतकर्यांनी स्वातंत्र्यानंतर या देशात आत्महत्या केलेल्या आहेत , मुळात या आत्महत्या नाहीत तर इथल्या व्यवस्थेने केलेल्या त्या हत्या आहेत, आता मात्र बळीराजा जागा होतोय  , शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करून दुकाने मांडनार्या वामनरुपी पुढार्यांना तुडवणारे हजारो बळी आता महाराष्ट्रात निर्माण झालेत असे परखड मत प्रसिद्ध व्याख्याते आणि पुणे सुपरफास्ट न्युजचे संपादक निलेश जगताप यांनी व्यक्त केले , गणेश मित्र मंडळ दौंडज यांनी बलप्रतीपदेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते , या वेळी संभाजी ब्रिगेडचे पुरंदर तालुका प्रमुख अजयसिंह सावंत , जेजुरी शहर प्रमुख संदीप जगताप , मराठा सेवा संघाचे जेजुरी शहर प्रमुख ज्ञानोबा जाधव , व्याख्याते अक्षय चाचर , रमेश पोवार , भूषण कापरे आदी उपस्थित होते ,कार्यक्रमाच्या सुरवातील  बैल , नांगर शेतीसाठी लागणाऱ्या औजारांचे पूजन करण्यात आले ,या वेळी दिलीप जाधव आणि रमेश कदम या शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला  , या वेळी बोलताना निलेश जगताप यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या त्याच बरोबर बळीराजाचा गौरवशाली इतिहास सुद्धा लोकांना समजावून सांगितला ," आजवर बळीराजाचा खरा इतिहास लोकांसमोर आला नव्हता मात्र तो  खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम संभाजी ब्रिगेडने केले असल्याचे मत अजयसिंह सावंत यांनी व्यक्त केले , शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न असतील तर ते आम्हाला सांगा आम्ही आपले कोणतेही प्रश्न सोडवू , आपल्या हक्कांसाठी लढायला आम्ही २४ तास तयार आहोत फक्त शेतकर्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन संदीप जगताप यांनी व्यक्त केले, या वेळी अक्षय चाचर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले ,   , या कार्यक्रमाचे नियोजन विक्रम फाळके , अमोल कदम , संदीप सावंत , विजय फाळके , संतोष कदम , प्रवीण भोसले , संदीप जाधव , निलेश जाधव , नितीन कदम हर्षद कदम  यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले , विक्रम फाळके यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले .
 
Top