चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन येथील डी मार्टसमोर एक्सप्रेस लेनवर गतीरोधक उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने काही दिवसांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र हा रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहने सावकाश जावीत यासाठी उभारण्यात आलेल्या या गतीरोधकावर आज दुपारी बाराच्या सुमारास एक भरधाव वेगातील दुचाकी आदळली. दुचाकी इतक्या वेगात होती की अपघातानंतर दुचाकीस्वार उडून समोरील चारचाकी वाहनावर जाऊन आदळला. ( प्रतिनिधी - केडी पाटीलसर )
 
Top