जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना पकडण्यात जेजुरी पोलिसांना यश आलेले आहे , शेतातील विहिरीवरील मोटार चोरी केल्याबद्दल जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे , मा.अतिरिक्त पोलीस अधीक्षक बारामती विभाग तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सह्हायक पोलीस निरीक्षक आर.बी.वाकोडे , पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले , पोलीस हवालदार खोखले , कर्मचारी अर्जुन, सचिन पडयाळ , संदीप कारंडे, रणजीत निगडे, विशाल जावळे यांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला , आणि 6 तारखेला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून तीन आरोपींना पकडण्यात आले , सलीम शेख ( वाय २१ ) , सचिन रोमण ( वय २७ ) , सुनील नाझीरकर ( वय २९ ) अशी आरोपींची नावे असून हे तीनही आरोपी पांडेश्वर येथील रहिवासी आहेत , पोलीस तपासात त्यांच्याकडून अनेक मोटारी मिळालेल्या आहेत , विहिरीवरील मोटार चोरी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे .
