आंबेगाव ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंचर वरून चाडोलीला जात असेलली टूव्हीलर आणि समोरून येणारी थ्रीव्हीलर यांच्यात जोरदार धडक झाली , या अपघातामध्ये टू व्हिलरवर असणारे प्रशांत काळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले असून, त्यांच्या मागे बसलेल्या त्यांच्या चुलत्याचा मात्र जागीच मृत्यू झालेला आहे . थ्री व्हीलर चालक किरकोळ जखमी झाला आहे .
