पॅरिस ( वृत्तसंस्था
) - पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला ; १५३ ठार >> आठ दहशतवाद्यांना कंठस्नान >> पंतप्रधान मोदींनी केला हल्ल्याचा निषेध पॅरिस, दि. १४ (पीसीबी) - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारची रात्र काळरात्र ठरली. येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सुमारे १५३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, २०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद करत संचारबंदी लागू केली आहे. आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. पॅरिसमधील स्थानिक वेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास हा हल्ला झाला. पॅरिसमध्ये एकूण ७ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. बॅटकला कॉन्सर्ट हॉलमध्ये सर्वाधिक हानी झाली असून, याठिकाणी १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी अॅटोमेटिक रायफलने नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. जर्मनी आणि फ्रान्स या दोन फुटबॉल संघांदरम्यान पॅरिसच्या नॅशनल स्टेडियममध्ये सामना सुरू असताना तीन स्फोट झाले. त्यामुळे सामना त्याठिकाणीच थांबविण्यात आला आणि उपस्थित प्रेक्षकांनी मैदानाच्या मध्यभागी येत आश्रय घेतला. या सामन्याला फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ओलाँद हेही उपस्थित होते. त्यांना याठिकाणाहून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. अध्यक्ष ओलाँद यांनी अतिसतर्कतेचा इशारा देत संचारबंदीची घोषणा केली आहे. फ्रान्सच्या सर्व सीमा बंद करण्यात आली आहेत. दीड हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. लष्करालाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. फ्रान्समधील सर्व विमाने उड्डाणे रद्द करण्यात आली असून, रेल्वे सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. या हल्ल्यात एकही भारतीय नागरिक जखमी झालेला नसून, भारतीय दुतावासाने मदतीसाठी ००३३१४०५०७०७ हा क्रमांक देण्यात आला आहे. जगभरातून निषेध पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख नेत्यांनी निषेध केला आहे. "पॅरिसमधील हल्ल्याचे वृत्त पाहून दुःख झाले. मृत नागरिकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही पॅरिसमधील नागरिकांसोबत आहोत", असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.