फलटण ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - गोखळी-पिंपरद् ता.फलटण येथे महाराष्ट्र व्यसन मुक्ती युवक संघ,गुरुकुल व आरोग्य केंद्र या सामाजिक संस्थाचा शुभारंभ मान्यवारं च्या उपस्थित आज भाऊबिज च्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात झाले.
या कार्यक्रमा च्या निमित्ताने मंगळवार दि.10ते शुक्रवार(भाऊबीज)दि.13 अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गुरु वय॔ मारूतीबाबा कुरहेकर व गुरुवय॔ अदृश्य काड्सिद्धेशर स्वामी जी यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य भारतीय जनता पक्षाचे प्रवकते मा.माधवजी भंडारी सो.तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,माजी न्याय मुर्ती बी.जी.कोळसे पाटील,आमदार दिपक चव्हाण, काॅ.विलास सोनवणे,सी.ओ.इंद्रजीत देशमुख,नातेपूते ग्रामपंचायतीचे संरपंच अॅड,भानुदास राऊत याच्यासह वारकरी संघटनेचे राज्यातील पदाधिकारी ,महाराष्ट्र व्यसन मुक्ती संघाचे पदाधिकारी तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी - निखील जगताप )
