बारामती ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - संपुर्ण देशात दिवाळी आनंदात साजरी होत असताना काही राजकीय नेत्यांची दिवाळी वेगळ्या पद्धातीने साजरी केली जाते. माजीकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे यामध्ये सर्वात अग्रगण्य असतात. बारामतीतील माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासुन शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आनि सर्व पवार कुटुंबिय एकत्र येउन पाडव्याचा दिवस साजरा करतात.
यावर्षी पाऊस कमी आहे. त्यामुळे लोक अडचणीत आहेत. मात्र, अडचणी विसरुन लोक दिवाळीचा सण साजरा करत आहेत. ही राज्यातली जमेची गोष्ट आहे. परंतू सत्तेत असो किंवा नसो लोकांना संकटातून बाहेर काढणं ही आमची जबाबदारी आहे. आपण त्यासाठी बांधिल आहोत अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. त्याचवेळी त्यांनी जनतेच्या अडचणीसाठी अखंड प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन दिलंय.