नगर ( पुणे सुपरफास्ट न्युज )  - आतापर्यंत गुन्हेगारांना देशात आणण्याच्या फक्त घोषणाच झाल्या; मात्र भाजप शासनाच्या प्रयत्नांमुळे छोटा राजनला भारतात आणण्यात यश मिळाले. आता अंडरवर्ल्ड डी गँग आणि दाऊदवर लक्ष्य केंद्रित करून त्या संदर्भात स्पेशल ड्राईव घेतला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी दिली आहे.
     छोटा राजनच्या आरोपांनुसार मुंबई पोलिसांचे दाऊदशी संबंध आहेत कि नाही, याची चौकशी चालू आहे. त्यामुळे या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी गृहराज्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
 
Top