पिंपरी - चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत क्षेत्रिय सभेचे आयोजन करण्यात आले असुन संबंधित प्रभागातील नागरिकांनी या सभेसाठी उपस्थित राहुन आपल्या प्रभागातील समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

26 नोव्हेंबर (गुरूवार) रोजी दिघी येथील छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय या ठिकाणी सकाळी साडेदहा ही सभा होणार आहे. यावेळी स्थानीक नगरसेवक चंद्रकांत वाळके आणि आशा सुपे उपस्थित असतील.तर  27 नोव्हेंबर ( शुक्रवार ) रोजी मोशी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत सकाळी अकरा वाजता ही सभा होणार आहे.नगरसेवक धनंजय आल्हाट व मंदाताई आल्हाट हे यावेळी उपस्थित असतील.
 
Top