पिंपरी- चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - महापालिकेच्या  अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने आज शनीवार ( दि. 21 नोव्हेंबर )  रोजी करण्यात आलेल्या कारवाईत चिंचवड येथील 1567 चौ.फुटावरचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले.
' ब ' क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत चिंचवड येथील प्रभाग क्र.23 या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.यावेळी 100 चौ.फुट असलेले अनधिकृत विटबांधकाम,केशवनगर व काकडे पार्क येथील 6 पत्र्याच्या शेड असे एकुण 1657 चौ.फुटावरचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले.
कार्यकारी अभियंते मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपअभियंता अजय सुर्यवंशी,सुनिल वाघुंडे यांच्यासह महापालिकेचे 10 पोलिस ,10 कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते
 
Top