जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - गेल्या तीन ते चार वर्षापासून पुणे नाशिक राष्ट्रिय महामार्ग ५० च्या रस्तारुंदीकरणाचे काम चालू आहे. या रुंदीकरणाच्या कामामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून प्रशासनाने शेतकऱ्यांना जमिनीला योग्य भाव दिला नसूनसुद्धा या महामार्गाच्या उत्तर भागात असणार्या आळेफाटयाजवळ पिंपळवंडी (चाळकवाडी) येथे या महामार्गाचा टोलनाका उभारण्याचा प्रशासन आणि ठेकेदार यांनी घेतला या निर्णयाच्या विरोधात या आगोदर शेतकर्यांनी आंदोलन केले होते प्रशासनाचा आदेश म्हणून तो निर्णय ग्रामस्थांनी बळजबरीने स्वीकारला.
     नुकत्याच या टोलनाका उभारणीसाठी म्हणजेच पायाभरणीसाठी मुरुमाऐवजी निकृष्ट दर्जाची मातीच्या ५०-५५ डम्पर एका रात्रीत खाली करून वापरण्याचा हा ठेकेदाराचा गलथानपना स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणून दिला व निकृष्ट माती जर पायाभरणीसाठी वापरणार असाल तर आम्ही हे प्रकरण उघडकीस आणू व जो पर्यंत पायाभरनीच्या नियमानुसार मुरूम टाकला जात नाही तोपर्यंत टोलनाक्याला विरोध राहील. अशी विनंती स्थानिकांनी केली.
     आपण पाहताय कि ठेकेदाराला आपला गलथानपना उघडकीस आला असून  हे पाहून तीच रातोरात टाकलेली निकृष्ट माती उचलावी लागती. 
     अशा या गैर कामकाजामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासन आणि ठेकेदार यांच्याबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. 
     वरील सर्व माहिती श्री. प्रदीप चाळक यांनी घटनास्थळी मुलाकती मध्ये  दिली. ( प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे )
 
Top