खेड ( पुणे सुपरफास्ट न्युज )  - सेझ बाधित शेतकऱ्यांना करारनुसार  जमीनी परत मिळायला पाहिजे किंवा बाजार दराने योग्य मोब्दला दिला गेला पाहिजे अशी भूमिका घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे . 
            मुंबई येथे खेड सेझ प्रश्नी तोडगा काढण्या साठी मा मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षते खाली दि ०२ रोजी  बैठक झाली. सदर मिटिंग मध्ये प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या वतीने  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा राजु शेट्टी , श्री सदाभाऊ खोत , ऍड योगेश पांडे , बापू करंडे यांनी बाजू मांडली व्  KDL कम्पनी व् KEIPL च्या ताब्यात असलेल्या १५% जमीनी करारनुसार ताबडतोब परत करण्याची मागणी केली . .                         
                  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी  परताव्या नुसार   जमीनी परत  करण्यासंबधी एम् आय डी सी चे राज्याचे मुख्याधिकारी श्री भूषण गगरानी यांस के आय ई पी एल ची भूमिका जाणून घेण्या संबधी सांगितले. प्रकल्प ग्रस्तांची १८३ हेक्टर जमीन अविकसीत परत देने व् विकस्नाचे कपात केलेले २५% रककम सव्याज परत करने असा प्रस्ताव सर्वानुमते मांडण्यात आला. सदर बैठकी साठी उद्योग मंत्री सुभाष देसाई ,पालक मंत्री गिरीश बापट , खा शिवाजीराव आढळराव पाटील , जिल्हाधिकारी सौरभ राव , केडीएल व् केईआय पीएल चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते . सदर बैठक करीता शेतकरी काशीनाथ दौड़कर , डॉ माशेरे, विष्णु दौड़कर , राजाराम गोरडे  , मारुती गोरडे , मारुती सुकरे , धोंडीबा साकोरे , नाना लोखंडे , काशीनाथ हजारे  आदि सेज बाधीत शेतकरी उपस्थित् होते. सदर बैठकीत सेज बाधीत १३ गावातील अधिग्रहनाचे शिकके काढण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल व्  सातबारे कोरे करण्यात येतील असे मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले. शासनाच्या सकारतमक भूमिके मुळे दि ८ नोव्हम्बर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटने द्वारे खेड सेझ येथे पुकारलेले आंदोलन स्थगित् करण्यात आलेले आहे अशी माहिती प्रवक्ते योगेश पांडे यानी दिली. ( प्रतिनिधी - सुनील ठिगळे ) 
 
Top