* मंगळवारी रात्री १२ ते बुधवारी पहाटे ४ च्या दरम्यानची घटना
* एपीआय गिरीधर यादव आणि पोलिस गणेश मोरेविरूध्द गुन्हा
* कंपनीच्या कर्मचार्यांना बोनस देण्यासाठी काढले होते पैसे
हडपसर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - कामानिमित्त मांजरी येथील गर्ंधव रेसिडन्सी येथे आलेल्या
वासन आय केअरच्या अधिकार्यांच्या वाहन चालकास बेदम मारहाण करून
त्याच्याकडील तब्बल ९६ लाख रूपये लुटल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील दोन
पोलिसांसह चौघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम
जप्त करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालु होते. दरम्यान, दोन पोलिसांनी
इतर दोन साथीदारांसह मिळुन ९६ लाख रूपये लुटल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीधर यादव, पोलिस कर्मचारी गणेश
मोरे (दोघेही हडपसर पोलिस स्टेशन), अविनाश देवकर आणि रविंद्र सोपान माने
अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात चालक विशाल देविदास भेंडे (३३,
रा. पांडवनगर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात ङ्गिर्याद दिली आहे. काही
कामानिमित्त वासन आय केअरचे डॉ. ठाकुर आणि त्यांचे सहकारी मांजरी येथील
गर्ंधव रेसिडन्सी येथे उतरले होते. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास
ते आणि त्याचे सहकारी ङ्ग्रेश होण्यासाठी गेले. त्यावेळी त्याच्या कारचा
चालक विशाल भेंडे गर्ंधव रेसिडन्सी खाली थांबला होता. कंपनीच्या
कर्मचार्यांना बोनस देण्यासाठी बँकेतुन काढलेले ६० आणि वेगवेगळया
सेंटरमध्ये जमा झालेले ३६ लाख असे एकुण ९६ लाख रूपये त्यांच्याकडे होते.
रात्रपाळी नसताना देखील सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीधर यादव, पोलिस
कर्मचारी गणेश मोरे हे त्यांच्या दोन साथीदारांसह तेथे पोहचले आणि भेंडेला
बेदम मारहाण केली. तेथुन त्यांनी भेंडेला मांजरी पोलिस चौकीत नेले.
त्यानंतर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे उलट सुलट चौकशी सुरू केली.
मंगळवारी रात्री १२ ते बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान एपीआय यादव आणि
पोलिस कर्मचारी मोरेने मांजरी पोलिस चौकी आणि हडपसर पोलिस ठाण्यात तमाशा
केला.
बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भेंडे यांच्याकडील ९६
लाख रूपये घेवुन त्यांना आणि इतरांना ठाण्यातुन बाहेर काढले. भेंडेने
सर्वप्रथम हॉस्पीटल गाठले. सकाळच्या सुमारास त्याने वासन आय केअरच्या
वरिष्ठ अधिकार्यांना घडलेला प्रकार सांगितले. त्यांच्या बैठका झाल्या.
त्यानंतर वासन आय केअरच्या अधिकार्यांनी हडपसर पोलिस स्टेशन गाठुन वरिष्ठ
पोलिस अधिकार्यांना घडलेली घटना सांगितले. प्रकरणाची सखोल चौकशी
केल्यानंतर एपीआय यादव, पोलिस कर्मचारी मोरे, अविनाश देवकर आणि रविंद्र
माने यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.
वानवडी विभागाचे सहाय्यक आयुक्त रविंद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.
यापुर्वी एपीआय यादव याच्याविरूध्द भादंवि ३२४ अन्वये हडपसर
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र, ङ्गिर्यादीने त्याच्याविरोधातील
तक्रार मागे घेतली होती. यादवची त्याप्रकरणी पीई (प्राथमिक चौकशी) सध्या
चालु आहे. यादव, मोरे आणि इतरांनी मद्यपान केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
एपीआय यादव हा मुळचा करमाळा येथील आहे. अटक केलेल्यांना गुरूवारी
न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.