पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या ३२५ मुला-मुलींना शांतिलाल मुथा पुण्यात शिक्षण व सांभालण्यासाठी आणणार असून या सर्वांची माहिती घेण्यासाठी मुथा यांच्या भारतीय जैन संघटनेने नुकतीच पाहणी पूर्ण केली.यावर्षी आम्ही बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील, २०१५ सालामध्ये आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या ३२५ मुला-मुलींना (१९३ मुले व १३२ मुली) २० नोव्हेंबर २०१५ रोजी त्या-त्या जिल्ह्यातून पुणे येथे शिक्षणासाठी घेऊन जाणार आहोत. या विद्यार्थ्यांचे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण, राहणे, भोजन, आरोग्य, मानसिक समुपदेशन, शालेय साहित्य इत्यादी संपूर्ण जबाबदारी घेऊन या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन करून त्यांची सर्वांगीण प्रगती घडवून आणणे हे या मागील उद्दिष्ट आहे, अशी माहिती  शांतिलाल मुथा यांनी पुणे सुपरफास्टशी बोलताना दिली.
 
Top