नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) - सुरूवातीला चर्चेत असलेल्या ब्लॅकबेरी मोबाईल कंपनीचे नाव काहीसे बुडत असल्याचे पहायला मिळत होते. मात्र कंपनीने मोबाईल विश्वात टिकून राहण्यासाठी आपला पहिला वहिला अँड्रोईड स्मार्टफोन लॉंच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘ब्लॅकबेरी प्रिव्ह’ या स्मार्टफोनची चाहत्यांना उत्सुकता होती.

कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनला किबोर्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमेरिकेत या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली असून याची किंमत ६९९ डॉलर म्हणजेच सुमारे ४५ हजार आहे. ब्लॅकबेरीचा हा स्मार्टफोन डेटा सुरक्षितेबाबतची पुर्वसुचना देणार आहे.

‘ब्लॅकबेरी प्रिव्ह’चे चे फिचर्स

» ५.४ इंच डिस्प्ले

» आठ जीबी इंटरनल मेमरी

» १.८ गीगाह्ट्स हेक्साकोर स्नॅपड्रॅगन

» तीन जीबी रॅम

» १८ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा

» पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

» ५.१. अँड्रोईड लॉलीपॉप

» ३४१० एमएएच बॅटरी
 
Top