जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - नवसाला पावणार देव म्हणून जगविख्यात असलेल्या कुलदैवत जेजुरीच्या
खंडेरायाला साडे तीनशे वर्षा पूर्वीच्या घटनेची ऐतिहासिक पुनरावृत्तीघडली
असून एका भाविकाने चक्क सोन्याचा भुंगा अर्पण
केला
जेजुरीच्या खंडोबाला रोज हजारो लोक दर्शनाला येत असतात त्याचे कारण हि तसे
असून या देवाला बोललेला नवस पूर्ण होतो ज्या भाविकाला देव पावतो तो
भाविकही मोठ्या आनंदाने बोलेल नवस फेडतो. आपल्या संसार सुखा करता व खंडोबा
देवावरील श्रद्धा करिता पुणे जिल्ह्यतील इंदापूर येथील भक्त दीपक नारयण
करगल यांनी सव्वा तोळे सोन्याचा भुंगा अर्पित केला आहे या शिवाय पुणे
जिल्ह्यातील शिरूर येथील संजय दत्तात्रय कोंडे यांनी एक किलो चांदीचा घोडा
वाहिला असून मुंबई च्या जयवंत आत्माराम पाटील आणि रवींद्र कृष्णा पाटील या
भाविकांनी आर्दा किलोचे चांदीचे चक्क बिस्कीट खंडोबा देवाला अर्पण केले आहे
सुमारे तीनशे ते चारशे वर्षा पूर्वी जेजुरीच्या खंडोबा गडावर तत्कालीन
मोगल सैनिकान कडून हल्ला करण्यता आला होता गडाच्या एका झरोक्यातून असंख्य
असे भुंगे निघाले आणि त्या भुंग्यांनी मोगल सैनिकावर हल्ला चढविला अखेर
मोघल बादशहा खंडोबा देवाला शरण गेला आणि त्याने खंडोबाचा मल्लूखान असा
उल्लेख करीत विनवणी केली तेव्हा त्याची व सैनिकाची सुटका झाली आपले म्हणणे
मल्लूखान उर्फ खंडोबा देवाने ऐकले म्हणून बादशहा ने त्यावेळी नऊ लाखाचा
सोन्याचा भुंगा अर्पण केला असा इतिहास आढळून येतो त्याचीच पुनरावृत्ती
तब्बल साडेतीनशे वर्षाने झाल्या चे दिसून येते . काही वर्षा पूर्वी
सातारा जिल्ह्यातील खटाव येथील एका भाविकाने बावीस ग्रँम ची चांदीची
आर्माडा गाडी चक्क नवस पूर्तता म्हणून वाहिली होती तर खंडोबाच्या गुप्तदान
पेटीत चांदीची रिक्षा व , विदेशी नोटाही सापडल्या होत्या .अनेक
भागातून लोक खंडोबाला नवस करतात व ते फेडतात अशा अनेक विविध वस्तू
देवसंस्थांच्या ताब्यात असून खंडोबाचे साहित्य .ग्रंथ या करिता नवे
प्रदर्शनीय खंडोबा साहित्य दालन खंडोबा गडावर उभारण्याचा मानस असल्याचे
श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त प्रमुख डॉ प्रसाद खंडागळे यांनी माहिती
देताना सांगितले ( प्रतिनिधी - अक्षय चाचर )
