आळेफाटा ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  ज्ञानराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आळे यांच्यावतिने सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटप
सन १९८८ सालापासून आळे व आळेफाटा परिसरात पारदर्शी कार्य तसेच ज्ञानराज इंग्लिश मेडीयम स्कूल या संस्थेमार्फत नावारूपाला आलेली हि ज्ञानराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था अशी या संस्थेची ओळख असून या संस्थेची स्थापना १९८८ साली केली. या संस्थेचे संस्थापक श्री. रामदास धर्माजी वाव्हळ, श्री. दत्तात्रय भागवत आणि श्री. धनंजय केशव काळे तसेच मार्गदर्शक म्हणून श्री. सुधीरशेठ वाव्हळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हि संस्था कार्यरत असून आळे आळेफाटा या दोन शाखा तसेच ज्ञानराज इंग्लिश मेडियम स्कूल हे शैक्षणिक संकुल उभारलेले आहे. ११३७ सभासदांच्या माध्यमातून व्यावसायिक जाळे निर्माण करून हि संस्था प्रगतीपथावर आहे. संस्थेने यावर्षी १५% लाभांश वाटप केला आहे. त्यातून दिवाळी भेटवस्तू केल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरन असून भविष्यात या संस्थेचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करून अशी माहिती अध्यक्ष श्री. दिलीप धर्माजी वाव्हळ यांनी दिली. दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यासाठी अध्यक्ष श्री. दिलीप धर्माजी वाव्हळ त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्री. प्रीतम नंदकुमार काळे, श्री. सुधीर किसन वाव्हळ, श्री. दत्तात्रय भागवत, श्री. धनंजय केशव काळे तसेच संस्थेचे इतर सदस्य व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
 
Top