मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड
पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील वर्षी जानेवारीमध्ये होत असलेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची आज निवड झाली.
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. सबनीस यांच्यासह ज्येष्ठ कवी प्रा. विठ्ठल वाघ, लेखक शरणकुमार लिंबाळे, लेखक-प्रकाशक अरूण जाखडे, श्रीनिवास वारुंजीकर असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. श्रीपाल सबनीस यांना सर्वाधिक ४८५ मते पडली. ११२ मतांनी ते विषयी झाल्याचे घोषित करण्यात आले. विठ्ठल वाघ यांना ३७३, अरूण जाखडे यांना २३०, शरणकुमार लिंबाळे यांना २५ तर श्रीनिवास वारुंजीकर यांना अवघी दोन मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद आडकर यांनी कामकाज पाहिले.
साहित्य महामंडळाने मताधिकार असलेल्या सदस्यांकडे एकूण एक हजार ७५ मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक हजार ३३ मतपत्रिका महामंडळाकडे परत आल्या होत्या. त्याची मतमोजणी आज करण्यात आली. साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठीच्या आजवरच्या निवडणुकीतील हे सर्वोच्च मतदान असल्याचे आडकर यांनी सांगितले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ या साहित्य संमेलनाची संयोजक संस्था आहे.