नाशिक ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - मराठवाड्यासाठीचा पाणी प्रश्न पेटला
आहे. नाशिक आणि नगर वासीयांनी जा
यकवाडी प्रकरणी आपला विरोध कायम ठेवला. तरीही कोर्टाने आदेश दिल्यावर जायकवाडीला पाणी सोडण्यात आलं. यामुळे आज नागरिकांचा रोष अनावर झाला. आणि पोलीसांनी याठिकाणी जमावबंदी करण्यात आली. भंडारदरा आणि निळवंडे या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले . निळवंडे धरणातून दोन हजार क्युसेक्सनं पाणी सोडण्याला सुरुवात झाली आहे. ते पुढच्या आठ दिवसांत जायकवाडीत पोहचेल अशी माहिती देण्यात आली आहे. मुळा खोर्यात ४ तारखेपर्यंत प्रवरा खोर्यात १२ तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, गंगापूर धरण आणि हतनूर धरणातुनही पाणी सोडण्यात येत आहे. पण अजुनही जायकवाडीसाठी पाणी सोडण्याला नाशिक आणि नगरचा विरोध आहे. जिल्हाप्रशासनाकडून पाणी सोडण्याचे आदेश मिळताच नाशिकचे प्रतिनिधी आणि शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानाबाहेर आपला विरोध नोंदवला. नदीवर ठिय्या आंदोलन करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत.