८ जागा मिळवीत शिवसेना ठरला मोठा पक्ष

चाकण ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - नवीनच निर्माण झालेल्या चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 8 जागा, अपक्ष 6, राष्ट्रवादी 7 तर भाजपाला फक्त 1 जागा मिळाली. चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही त्यामुळे अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, त्यामुळे चाकण मध्ये किंग कोणीही झाले तरी अपक्षहेच किंगमेकर असतील  चाकणसाठी एकूण 22 प्रभागांत 85 टक्के मतदान झाले. यामध्ये 17 हजार 601 पैकी 15 हजार 130 मतदारांनी मतदान केले. चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने 8 जागांवर आपले वर्चस्व मिळविले आहे तर राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता कोणाच्या हातात जाणार यावर अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आमदार सुरेश गोरे यांनी प्रतिक्रीया घेतली असता ते म्हणाले, अपक्ष उमेदवार हे आमचेचे असल्यामुळे ते शिवसेनेबरोबरच असणार आहेत. त्यामुळे चाकण नगरपरिषदेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार आहे. आम्ही भाजपालाही आमंत्रित करत आहोत. चाकणमध्ये शिवसेनेचीच सत्ता राहील, असा दावा आमदार गोरे यांनी केला आहे. विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे- वॉर्ड क्र. 1 प्रकाश लक्ष्मण गोरे (अपक्ष) वॉर्ड क्र . 2 राजेंद्र दत्तात्रय गोरे (शिवसेना) वॉर्ड क्र . 3 मंगला विनोद गोरे (अपक्ष) वॉर्ड क्र . 4 ऋषिकेश चंद्रकांत झगडे (शिवसेना) वॉर्ड क्र . 5 स्नेहा वसंत भुजबळ (राष्ट्रवादी) वॉर्ड क्र . 6 अश्विता प्रकाश लांडे (राष्ट्रवादी) वॉर्ड क्र . 7 अनिता दिलीप कौटकर (राष्ट्रवादी) वॉर्ड क्र . 8 स्नेहा नितीन जगताप (शिवसेना) वॉर्ड क्र . 9 शेखर श्रीराम घोगरे (शिवसेना) वॉर्ड क्र . 10 सुरेखा मनोहर गालफाडे (भाजपा) वॉर्ड क्र . 11 किशोर ज्ञानोबा शेवकरी (शिवसेना) वॉर्ड क्र . 12. मेनका सागर बनकर (राष्ट्रवादी) वॉर्ड क्र . 13 दामु सुदाम शेवकरी (अपक्ष) वॉर्ड क्र . 14 निलेश बबन गोरे (शिवसेना) वॉर्ड क्र . 15 प्रवीण सीताराम गोरे (अपक्ष) वॉर्ड क्र . 16 संगीता दत्तात्रय बिरदवडे (राष्ट्रवादी) वॉर्ड क्र . 17 वृषाली योगेश देशमुख (राष्ट्रवादी) वॉर्ड क्र . 19 हुमा जहीर अब्बाज शेख (शिवसेना) वॉर्ड क्र . 20 जीवन सोनवणे (राष्ट्रवादी) वॉर्ड क्र . 21 प्रकाश राजाराम भुजबळ (अपक्ष) वॉर्ड क्र . 22 पुजा साहेबराव कड (शिवसेना) वॉर्ड क्र . 23 धीरज प्रकाश मुटके (अपक्ष) यापैकी एका उमेदवाराचे निधन झाल्याने 18 क्रमांकाच्या प्रभागातील निवडणूक स्थगित ठेवण्यात आली होती. या वॉर्डची निवडणूक 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
 
Top