कोल्हापूर (पुणे सुपरफास्ट न्युज ) -  कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, सतेज पाटील यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने ते सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना-भाजपाने स्वतंत्र लढून प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी ५०७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूरात स्वत: मुख्यमंत्री महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. याठिकाणी खरे तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आमदार महादेव महाडिक यांची कसोटी पणाला लागली होती. त्यात सतेज पाटील यांनी आपले वर्चस्व सिध्द केले. निकाल हाती येताच राष्ट्रवादीच्या साथीने काँग्रेसने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास अनुकूल असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. पक्ष जागा काँग्रेस २७ भाजप १३ ताराराणी १९ राष्ट्रवादी १५ शिवसेना ४ अपक्ष ३


 
Top