जुन्नर ( पुणे सुपरफास्ट  न्युज ) -  जुन्नर मध्ये आमदार शरददादा सोनवणे यांचे हस्ते बुधवार दि.4 नोव्हेंबर रोजी विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
       आमदार शरददादा सोनवणे यांचा स्थानिक आमदार निधी आमदारांनी प्रयत्न करून सरकारच्या
विविध योजनांमधून तालुक्यासाठी आणलेला निधी अशा एकूण 7 कोटी  31 लाख आणि खासदार शिवाजीदादा आढळराव यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला 2 लाख 85 हजार असा एकूण 7 कोटी 60 लाख रूपयांच्या विकासकामांची भूमीपूजन  बुधवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थित मध्ये होणार आहेत.
     जुन्नर तालुक्यातील पश्चिम, पूर्व आणि मध्य अशा सर्वच भागात विकास साधण्याचा प्रयत्न आमदार शरददादा सोनवणे यांनी केलेला दिसतो आहे. आणि त्यातच गेल्या 15-20 वर्षापासून विकासापासून वंचित असणा-या आदिवासी भागाला विकास निधीमध्ये झूकते माप देऊन आदिवासी जनतेच्या जिवावर राजकारण करणा-या नेत्यांना आमदारांनी विकासाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
          जुन्नर तालुक्याला पहिल्याच वर्षी इतका मोठा निधी मिळवून  देणारा आणि तो खर्च करणारा हा पहिलाच आमदार आहे. अशी भावना जनतेनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली.आमदारांनी अशाच वेगात कामाचा आलेख चढता ठेवला तर लवकरच जुन्नर तालुका विकासात पुणे जिल्हात नं 1 ला येइल.
 
Top