सखे महागाईच्या या भडक्यात....!!!
एक होती प्रेमळ...
अगदी साधी सरळ...
मला सावरणारी..
मला समजून घेणारी....
भेट तिची माझी ...
नेहमीची ठरलेली....
कठीण प्रसंगी ही...
ती माझ्या सोबत फिरलेली...
प्रत्येक प्रवासात माझ्या...
मला साथ ती दयायची...
कितीही लांबचा असू दे प्रवास...
ती माझ्याशी एकरूप मात्र व्हायची...
अचानक...
ऐन दिवाळीत... चढला तिला भाव....
तिच्यामुळेच हा प्रियकरही...
खूप राडला ना राव...
महगाई च्या भडक्यात...
फोडला तु भाववाढीचा बार...
सखे या दिवाळीला..
गावी जायचंच नाही का यार...
मग त्या प्रियकरानेही ठरवलं...
तिच्या भाव वाढीचा... निषेध आपण पाळु....
अन् प्रवासा साठीचा तिचा (एस. टी चा) सहवास मात्र टाळु...
आपली प्रत्येकाची सखी, लाडकी, प्रियसी...
वाढलेल्या तिकीटा साठी....
S.T
Written by:- भावेश जनार्दन म्हसकर (Ek प्रियकर) मुंबई
९०२९५०८९०७
Team@punesuperfastnews
