पिंपरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पिंपरी चिंचवड येथील  यमुनानगर येथे घरात पेस्ट कंट्रोल केल्याने घरातील प्रेमी युगुलाचा श्वास गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यूझाल्याची घटना घडली आहे.  सहायक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर भागात राहणाऱ्या लगाड़िया यांच्या फ्लॅटमध्ये काल पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. काल सायंकाळी लगाड़िया यांचा मुलगा धवल  ( वय २४ ) हा आपली मैत्रीण मंदिरा ( वय २६ ) हिला घरी घेऊन आला.
यावेळी ते दोघे घरात एकटेच होते. काही वेळाने पेस्ट कंट्रोलचा त्रास दोघांनाही जाणवू लागला. दोघांचाही श्वास गुदमरल्याने दोघांनाही तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास धवलचा तर आज सकाळी सातच्या सुमारास मंदिरा हिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात तपास करीत आहेत. ( प्रतिनिधी - मेहबूब शेख )
 
Top