इंडोनेशिया (वृत्तसंस्था)  -
अंडरवर्ल्ड विश्वातील मोस्ट वाँटेंड डॉन छोटा राजनला इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक करण्यात आलं आहे. एएफपीने याबाबतची माहिती दिली आहे. अंडरवर्ल्ड विश्वातील मोस्ट वाँटेड गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. इंडोनेशियातील बाली इथं छोटा राजनला पकडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या वृत्ताला गृहमंत्रालयाने दुजोरा दिला आहे. मात्र, त्याला ऑस्ट्रेलियन पोलीसांच्या माहितीवरून इंडोनेशिन पोलीसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई आणि भारतातील अनेक गँगवॉरमध्ये छोटा राजनचा हात होता. गेल्या अनेक दशकांपासून तो फरार होता. अनेक दिवसांपासून मुंबई पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर छोटा राजन दाऊद टोळीतून बाहेर पडला होता. गेली दोन दशकं तो पोलीसांना चकमा देत होता. छोटा राजनच्या अटकेनंतर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. छोटा राजनला शकील करून धोका होता का? छोटा राजन गंभीर आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे ही त्याची शरणागती होती का असा प्रश्न सुद्धा विचारला जात आहे.
 
Top