बापट म्हणतात, ठेवलेली जास्त त्रासदायक
गिरीश बापट पुन्हा वादाच्या भोव-यात
गिरीश बापट पुन्हा वादाच्या भोव-यात
चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
आम्हाला नवरा बायकोच्या भांडणापेक्षा ठेवलेलीचा जास्त त्रास
आहे, अशी मिश्कील टिप्पणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी
केली आणि नव्याने वाद ओढवून घेतला आहे. रात्रीच्या व्हिडिओ क्लिपबाबत
पुण्यात केलेल्या वक्तव्याने वादग्रस्त ठरलेले बापट अजूनही तोंडाला लगाम
घालू शकलेले नाहीत.
चिंचवड येथे फेडरेशन ऑफ असोसिएशन या व्यापा-यांच्या संघटनेने
आयोजित केलेल्या कार्यक्रमात बापट यांचा तोल पुन्हा सुटला. ठेवलेलीशी नाजूक
नातं असतं. घरातल्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी सांगत नाही, नाहीतर पुन्हा
क्लिप काढून बायकोपर्यन्त जाईल म्हणून घरातलं भांडण घरातच सोडविण्याचा आमचा
प्रयत्न असतो, असे बापट म्हणाले.
व्यापारी आणि सरकार यांचं नातं नवरा- बायकोचं असतं, असं माजी
खासदार गजानन बाबर त्यांच्या भाषणात बोलले होते. त्याला उत्तर देताना बापट
असं बोलले खरे, पण ठेवलेली हा शब्द कुणाला त्यांनी कोणाला उद्देशून
उच्चारला, हा उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच चर्चेचा विषय ठरला. (प्रतिनधी - मेहबूब शेख )
