आंदोलनाकडे जनतेची पाठ
जुन्नर (पुणे सुपरफास्ट न्यूज ) आज दि.25/10/15 रोजी नारायणगाव येथे जुन्नर राष्ट्रवादी काॅग्रेस ने महागाई विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनाकडे जनतेनी अक्षरशः पाठ फिरवली.
तालुक्यातील राष्ट्रवादीचे
नेते अतुल बेनके तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार आणि काही मोजकेच कार्यकर्ते
या वेळी उपस्थित होते. महागाई ने जनता त्रस्त आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी जुन्नर बाजार
समिती मध्ये सत्तेमध्ये असलेली सेना -राष्ट्रवादी तालुक्यात एकत्र राहतात
आणि परत राष्ट्रवादी महागाई च्या विरोधात सरकार विरोधात आंदोलन करते ज्या
सरकार मध्ये शिवसेना आहे. ही गोष्ट जुन्नर तालुक्यातील जनतेला रूचली नसावी
आणि राष्ट्रवादी मधील अंतर्गत वाद हे पण गर्दी कमी होण्याचे एक कारण असू
शकते.
त्यामुळे येणा-या काळात जुन्नर राष्ट्रवादी ला खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. ( प्रतिनिधी - तुषार येवले )