नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )- देशात बलात्कारांच्या घटनात वाढ होत असताना नवी दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आहे.कबरीतून तरुणीचा मृतदेह उकरुन काढून तिच्यावर गँगरेप झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलिसही सुन्न झाले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे , गाझियाबादमध्ये एका गर्भवती तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्या मृतदेहाचं दफन केलं.मात्र, यानंतर काहीच तासांत ही कबर उकरुन काढल्याचे वृत्त कुटुंबीयांना मिळाले. हे ऐकून आधी त्यांना धक्का बसला, मात्र एखाद्या प्राण्याने ते उकरलं असावं अशी मनाची समजूत काढत त्यांनी तिथे धाव घेतली.मात्र, घटनास्थळी पोहचताच कुटुंबीयांचेही धाबे दणाणले. तरुणीचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला होता.तिच्यावर मृत्यूनंतर गँगरेप झाल्याचे प्राथमिक पुरावे आहेत. पोलिसांनीही या शक्यतेचा इन्कार केलेला नाही. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतरच सविस्तर माहिती मिळू शकेल.
 
Top