जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - महाराष्टात अग्रगण्य असलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा.श्री. सत्यशील दादा शेरकर यांच्या
  संकल्पनेतून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १०़० टनापेक्षा जास्त उत्पादन घेणा,-या ५१ शेतक,-यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पारगाव  तर्फे आळे सर्वाधिक उत्पादन घेणा-या साै. कलावती हरिभाऊ चव्हाण, यावेळी मा.श्री. बाळासाहेब खिलारी , कारखान्याचे सर्व आजी व माजी संचालक, मा.श्री. संजयशेठ काळे, मा.श्री. विठठलबाबा मांडे, मा.साै. आशाताई बुचके, मा.श्री. तात्यासाहेब गुंजाळ, मा.श्री. रघुनाथशेठ लेंडे, मा.श्री. दिलीप डुंबरे, मा.साै. संगिताताई वाघ, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समिती जुन्नर सर्व सदस्य, जुन्नर बाजारसमितीचे सर्व संचालक, तालुक्यातील सर्व नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तालुक्यातील सर्व  विविध कार्यकारी साेसायटीचे चेअरमन व सर्व संचालक, विविध गावांचे पदाधिकारी, व ऊस ऊत्पादक शेतकरी सभासद, तालुक्यातील सर्व मित्र परिवार माेठया संख्येने उपस्थित हाेते. ( प्रतिनिधी - तुषार येवले )
 
Top