सह्हायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची बदली


जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याच्या सह्हायक पोलीस निरीक्षकपदी रामदास वाकोडे यांची नियुक्ती झाली आहे , ते यापूर्वी शिरूर तालुक्यातील टाकळी येथे कार्यरत होते , या अगोदर या ठिकाणी रामदास शेळके कार्यरत होते , मात्र अचानक त्यांची बदली करण्यात आली ,
 जेजुरी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले  तपास कामात अतिशय चाणाक्ष म्हणून आपली ओळख असलेले सहायक पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यावर आता मोठी जबाबदारीची सूत्रे आहेत, सह्हायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी आपल्या काही  महिन्यांच्या कालावधीत अनेक  गुन्हय़ांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणले. आरोपींना अटक करून तक्रारदारांना न्याय मिळवून दिला. कर्मचाऱयांकडून नियोजनबद्ध तपास करून घेतला. तपासाबरोबरच कर्मचाऱयांना शिस्तीचे धडेही दिले., अजूनही काही गुन्ह्याचा तपास झालेला नाही  अशा गुन्हय़ांच्या तपासात आता नव्याने रुजू झालेले सह्हायक पोलीस निरीक्षक वाकोडे  यांनी लक्ष घालावे , अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
 अवैध दारू वाहतूक रोखण्याचे काम राज्य उत्पादन शुल्कचे असले तरी पोलिसांनी त्याकडे कानाडोळा करू नये., जेजुरीमध्ये महाविद्यालयातील मुलीना अनेक वेळा सामोर्या जावे लागणारे छेडछाडीचे प्रकार असतील तसेच 
जेजुरी परिसरात असलेले अवैध धंदे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सह्हाय्क पोलीस निरीक्षक श्री. रोकडे  यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही नागरिकांतून व्यक्त होत आहे,  
 
Top