सरचिटणीस पदी प्रभाकर क्षीरसागर, उपाध्यक्ष पदी विनायक कांबळे यांची निवड
पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत कृष्णकांत कोबल यांची बहुमताने कार्याध्यक्ष पदी निवड झाली आहे. संघटनेच्या सरचिटणीस पदी प्रभाकर क्षीरसागर, उपाध्यक्ष पदी विनायक कांबळे यांचीही बहुमताने निवड झाली आहे. तर वनिता कोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा पत्रकार संघाची द्वैवार्षिक
कार्याध्यक्ष पदासाठी कृष्णकांत कोबल व राजेंद्रकृष्ण कापसे हे दोन उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी कोबल यांना 160 तर कापसे यांना 89 मते मिळाली. कोबल यांनी 71 मतांनी कापसे यांचा पराभव केला. सरचिटणीस पदासाठी प्रभाकर क्षीरसागर यांच्या विरोधातही श्री. कापसे यांनी उमेदवारी दाखल केली होती. तेथेही क्षीरसागर यांनी विजय मिळविला. दोन्ही जागेवर कापसे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उपाध्यपदाच्या निवडणूकीत विनायक कांबळे यांनी प्रतिस्पर्धी उमेवार राजेंद्र सांडभोर व वनिता कोरे यांच्यावर मात करीत विजय मिळविला.
कोषाध्यक्ष पदासाठी वनिता कोरे यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची यापूर्विच बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीराम कुमठेकर व शरद काटकर यांनी काम पाहिले. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरे, परिषदेचे विश्र्वस्त किरण नाईक, आदींच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, हवेली तालुका अध्यक्ष शरद पुजारी, ज्येष्ठ पत्रकार श्याम निलंगेकर, प्रमोद गिरी, विवेक काटमोरे, शैलेंद्र बेल्हेकर, तुळशीराम घुसाळकर, अनिल भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.
कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल म्हणाले, " पत्रकार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या ऐकायला मिळाल्या. आरोग्य, असुरक्षितता आदी समस्या गंभीर आहेत. ओळखपत्र मिळावे, सर्वसाधारण सभा व्हावी, आरोग्य सुविधा मिळाव्यात अशा विविध मागण्या त्यांच्याकडून होत आहेत. त्याला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. "
निवडणूक नुकतीच पार पडली. पोस्टाद्वारे मतपत्रिका मागवून ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवण्याची जिल्हा संघाची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्ह्यातील पत्रकार मतदारांनी या प्रक्रियेचे आनंदात स्वागत केले. 398 सभासदांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी 250 मतपत्रिका संघाकडे आल्या होत्या.