चाकण ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  चाकण नगरपरिषद निवडणुकीसाठी आज शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
          या प्रसंगी आमदार सुरेश भाऊ गोरे,महिला आघाडीच्या विजया ताई शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, युवासेना पुणे जिल्हा अधिकारी गणेशभाऊ कवडे, सुलभा उबाळे,जि.प.सदस्य किरण मांजरे आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.शिवसेनेच्या आजच्या रॅलीला मिळालेला जोरदार प्रतिसाद पाहून शिवसेना विजयश्री मिळवणार आणि चाकण नगरपरिषदेवर भगवा फडकणार अशी चर्चा आज चाकण मध्ये मतदारांनमध्ये पाहण्यास मिळाली
चाकण शहराचा विकास फक्त शिवसेनाच करू शकते.आणि माझा मतदार राजा जसा खासदारकी आणि आमदारकी च्या निवडणुकीत सेनेबरोबर राहीला तसाच उद्या   होणा-या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला मतदान करा असे आवाहन शिरूर चे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी चाकणच्या जनतेला केले.
 
Top