धुळे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - काळाच्या ओघात तंत्रज्ञान सुद्धा वेगाने विकसित होत आहे, प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आले , अन्न वस्त्र , निवारा यांचप्रमाणे देशातील लाखो युवकांची मुलभूत गरज आज इंटरनेट झाली आहे ,येत्या दि. 9 नोव्हेंबर 2015 रोजी कुसुंबा ता. जि. धुळे येथे कुसुंबा ग्रामपंचायत
मोफत वाय-फाय सेवा या योजनेचा शुभारंभ करित आहे . आपल्या ग्रामस्थांसाठी
पुर्णपणे मोफत वाय-फाय सेवा देणारी कुसुंबा ग्रामपंचायत ही देशातील पहिली
ग्रामपंचायत ठरनार आहे , कुसुंबा हे 100% वाय-फाय ने जोडलेले देशातील पहिले गाव
आहे. टेलस्टार इन्फोटेक या कंपनीच्या सहकार्याने संपुर्ण गावात 20 ठीकाणी
वाय-फाय यंत्र (device) बसविण्यात आले आहेत. नागरीकांना ही सेवा
ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत देण्यात येणार असून त्यासाठीचे शुल्क
ग्रामपंचायत भरणार असून त्याचा कुठलाही अतिरिक्त कर ग्रामस्थांवर लादण्यात
येणार नाही.
