खेड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  राजकारणामध्ये कधी कोण काय करेल  हे सांगता येत नाही.असाच एक आश्चर्य चकित करणारा प्रकार  घडलाय पुणे जिल्ह्यातील  खेड तालुक्यातील
ढोरे भांबुरवाडी या गावामध्ये , ग्रामपंचायत निवडणूकी  मध्ये ९३ वर्षांची आजीबाईने  ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि निवडूनही आली. राजकारनामध्ये शक्यतो ८०-८५ वयानंतर राजकारणी मंडळी राजकारनातून निवृत्ती घेतात .परंतू नव्वदी पार केल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवलेल्या या आजीबाईंच्या जिद्दीचे आणि धाडसाचे कौतूक करायला हवे.या आजीच्या गळ्य़ात पहिल्याच प्रयत्नांत विजयाची माळ पडली आहे.
अवघ्या गावासाठी कौतुकाचा विषय ठरलेल्या या आजीबाईंचं नाव आहे गंगूबाई नवृत्ती भांबरे. गावात एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होती. त्यातील एका प्रभागात आजीबाईंनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारत ३0 मतांनी विजय मिळवत राजकारणाच्या पदार्पणातच यश मिळवलं. मग काय, गावानं आजीबाईंची मिरवणूक काढली. नातवांनी आजी बाईला खांद्यावरती घेवून नाचवले.गावातली ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटली, की गावकी-भावकीचं राजकारण आलंच. विरोधकांनी एका महिला उमेदवाराला संधी दिली म्हटल्यावर आपलाही उमेदवार तुल्यबळ हवाच. मग, चर्चा करता करता नाव पुढे आलं, गंगूबाईचं. नव्वदी पार केलेल्या एका आजीबाईचं. आज्जीला ओळखत नव्हतं, असं गावात कुणीही नव्हतं. मग काय आजीबाई उतरल्या निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या आखाड्यात. त्यांनी जबरदस्त प्रचार करत विजय मिळविला, मी कधीच कुणाशी वाद घातले नाहीत , सगळ्यांना सहकार्य केले , आणि आता मी गावाचा विकास करणार असल्याची ग्व्हाही त्यांनी "पुणे सुपरफास्ट न्युज" शी बोलताना दिली.( प्रतिनिधी- हेमंत चोपडे )
 
Top