पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) – भारतीय हवाईदलात एज्युकेशन इन्स्ट्रक्टर, भारतीय वायू सेना पोलीस, ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर अॅन्ड ऑटो टेक्निशियन पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार असून, १७ व २२ नोव्हेंबरला बालेवाडी-महांगुळे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात भरती पुर्व परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या पदासाठी उमेदवार महाराष्ट्राचा
रहिवाशी असणे बंधनकारक आहे. उमेदवाराने कला, वाणिज्य आणि विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवारही अर्ज करु शकतो. तसेच, शासनमान्य शाळेत किंवा महाविद्यालयात किमान २ वर्षे अध्यापनाचा अनुभव असावा. 

पदवीधर उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट १९९१ ते ३१ मे १९९६ कालावधी दरम्यानचा असावा. तसेच, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट १९८८ ते १ मे १९९६ दरम्यानच्या कालावधीचा असावा. उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व गुणपत्रकांच्या ५ छायांकित प्रती व १० पासपोर्ट आकारांच्या फोटोसह परिक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली.
 
 एअरमन सिलेक्शन ग्रुप वाय (नॉन टेक्निकल) पदे, इंडियन एअर फोर्स पोलीस, ग्राऊंड ट्रेनिंग इन्सट्रक्टर ॲण्ड ॲटो टेक्निशियन पदासाठीही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा अविवाहीत महाराष्ट्रीयन असावा. त्याचा जन्म १ फेब्रुवारी १९९६ ते ३१ मे १९९९ या कालावधीतील असावा. उमेदवार कला,  वाणिज्य आणि विज्ञान  यापैकी कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के गणु घेवून उत्तीर्ण झालेला असावा. त्यांची उंची किमान १६५  सेंटीमीटर असवी. या पदांसाठी बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात दि. २२ नोव्हेंबर २०१५ रोजी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या परिक्षांसाठी पूर्व नोंदणी करण्यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक करण्यात आले आहे. दि. २९ ऑक्टोबर (आज) रोजी बीड, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, परभणी, ठाणे, दि. ३० ऑक्टोबरला कोल्हापूर, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग, दि.३१ ऑक्टोबरला सातारा, रत्नागिरी, लातूर, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर भागातील उमेदवारांनी नोंदणी करावी. तसेच, या जिल्ह्याव्यतीरिक्त इतर जिल्ह्यातील उमेदवारांना नोंदणी करण्याची आवश्यकता नसून त्यांनी दि. २२ नोव्हेंबरला थेट परिक्षास्थळी उपस्थित रहावे. उमेदवारांनी दहावी व बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्रकांच्या ५ छायांकित प्रती तसेच १० पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत. तसेच, अधिक माहितीसाठी www.indianairforce.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top