उत्तरप्रदेश ( वृत्तसंस्था ) - गगनाला भिडलेल्या तूरडाळीच्या भावावरुन सोशल मिडियावर जोक्सचा भडीमार सुरु असतानाच उत्तर प्रदेशातील एका विवाह सोहळयात वधू-वराला चक्क तूरडाळीचा आहेर करण्यात आला आहे. सीतापूर येथे पार पडलेल्या लग्नसोहळय़ात हा अनोखा आहेर देण्यात आला आहे. सिराज नावाच्या तरूणाच्या लग्नात कार्तिक आणि आलोक या त्याच्या जीवलग मित्रांनी भेटवस्तू म्हणून त्याला ३० किलो तूरडाळ दिली. या अनोख्या भेट वस्तूने उपस्थित वऱ्हाडीसुद्धा हरखून गेले. सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. डाळींचे भावही गगनाला भिडले आहेत. अशावेळी आपल्या खास मित्राला डाळींच्या वाढलेल्या दराचा फटका बसू नये, या उद्देशाने आहेर म्हणून त्याला तूरडाळ देण्याचा निर्णय घेतल्याचे कार्तिक आणि आलोक यांनी सांगितले
 
Top