सेक्स... सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय... त्याबद्दल बोलावंसं सगळ्यांनाच वाटतं , पण त्यावर आजही फक्त कुजबुजलं जातं किंवा मित्रा-मित्रांच्या गटात टाइमपास म्हणून त्यावर गप्पा रंगतात. त्यातून काहीतरी गैरसमजच निर्माण होतात. ‘ ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यू ’, असा निष्कर्ष आजपर्यंत अनेकदा काढण्यात आला. पण...
१. तणावापासून मुक्ती
सेक्समुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं आणि स्वाभाविकच तणावापासून मुक्ती मिळते, असा निष्कर्ष स्कॉटलंडच्या अभ्यासकांनी काढला आहे. त्यासाठी त्यांनी २४ स्त्रिया आणि २२ पुरुषांवर प्रयोग केले आणि त्यांची मतं जाणून घेतली. त्यानुसार जे नियमित सुरक्षित शारीरिक संबंध ठेवतात ते दैनंदिन जीवनातील धकाधकीतही रिलॅक्स राहू शकतात.

२ . रोगप्रतिकारक शक्ती वाढते
विल्किस युनिवर्सिटीनं ११२ विद्याथ्याËवर एक प्रयोग केला. आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा संभोग केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते , असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सर्दी-तापासारखे आजार दूर राहू शकतात.


३. वजन कमी होऊ शकतं
स्थूलता , ही आज सगळ्यांना भेडसावणारी मोठी समस्या. हायपर टेंशनमुळे , ब्लड प्रेशर वाढतं आणि त्यासोबत वजनही.. परंतु सेक्समुळे वजन कमी होण्यास मदत होते , असा निष्कर्ष अमेरिकन असोसिएशन ऑॅफ सेक्शुएलिटी एज्युकेटर्स अँड थेरेपिस्टसनं अभ्यासाअंती काढला आहे. अर्धा तास सेक्स केल्यानं ८५ कॅलरी घटतात. अशी ४२ सेशन्स झाली की ३५७० कॅलरीज जळून गेल्यानं एक पाउंड वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे शरीरासोबतच , मानसिक स्वास्थही सुधारू शकतं.

४. सेक्समुळे टळतात हृदयाचे रोग
आपल्याकडे अशी चुकीची समजूत आहे की वाढत्या वयात सेक्सच्या तणावामुळे हार्ट अ‍ॅटक येण्याची शक्यता असते. पण इंग्लंडमधल्या संशोधकांच्या निष्कर्षानुसार हे पूर्णपणे खोटे आहे. एपिडिमियॉलॉजी अ‍ॅड कम्यूनिटी हेल्थ या वैज्ञानिक जर्नलमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या या अभ्यासानुसार महिन्यातून एकदा सेक्स करणाऱ्याच्या तुलनेत आठवडयातून एक किंवा दोनदा सेक्स करणाऱ्याला हृदयरोगाची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते.

५. सेक्सने वाढतो आत्मसन्मान
टेक्सास विद्यापीठातील संशोधनानुसार सेक्स केल्याने आत्मसन्मान वाढतो. केंब्रिज विद्यापीठातील प्रा. जीन ऑँगदेन याविषयी म्हणतात , की चांगला सेक्स हा आत्मसन्मानाने सुरू होतो आणि आत्मसन्मान वाढवतोही. ज्यांच्याकडे हा आत्मसन्मान ठासून भरला आहे त्यांना सेक्स नव्या उंचीवर नेऊन पोहचवतो.

६. सेक्सने दृढ होतं नातं
पिटसबर्ग युनिवर्सिटी आणि नॉर्थ कॅरोलाइना युनिवर्सिटीमध्ये झालेल्या संशोधनानुसार सेक्समुळे ऑॅक्सिटॉसिन हार्मोन्सच्या संख्येत वाढ होते. परस्परांमधील नातं दृढ होण्यासाठी या हार्मोन्सचा फायदा होतो असं विज्ञान सांगतं. म्हणूनच या हार्मोन्सना ‘ लव हार्मोन्स ’ असेही म्हणतात. जोडीदाराबद्दल विश्वास वाढविण्यासाठी सेक्स ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.

७. वेदना शमवतो सेक्स
नियमित सेक्समुळे एंड्रोफिन हार्मोनमध्ये वाढ होते. हे हार्मोन वेदनाशामक म्हणून ओळखले जातात. यामुळे डोकेदुखी , आर्थरायटिस अशा वेदनादायी दुखण्यातून मुक्ती मिळते. म्हणूनच सेक्स वेदनाशमन करतो असे म्हटले तर अगदीच चूक ठरणार नाही.

८ . सेक्समुळे कॅन्सरही टळू शकतो
पुरुषांच्या ओटीपोटाच्या जागी प्रॉस्टेट ग्रंथी चाळिशीनंतर खूप त्रास द्यायला लागतात. त्यांना सूज येते. पण त्यावर लक्ष न दिल्यास कित्येकदा प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरचा धोका असतो. या कॅन्सरचा अभ्यास करून संशोधकांनी युरॉलॉजी इंटरनॅशनलच्या ब्रिटिश जर्नलमधे नुकताच एक प्रसिद्ध केला आहे. तुम्ही जर तीस वर्षांच्या आत किंवा जवळपास असाल तर सतत सेक्सबाबत कंटाळा करू नका. ब्रेक न घेता नियमित सेक्स केल्याने भविष्यात प्रॉस्टेट कॅन्सर होण्याचा धोका टळतो. त्यामुळे आनंदासाठी नसेल तर आरोग्यासाठी तरी नियमित सेक्स सुरू ठेवा.

९. सेक्समुळे पेल्विक स्नायू मजबूत होतात
विशेषत: गरोदरपणात स्त्रियांच्या कमरेजवळची पेल्विक पोकळी कमजोर होती. या पोकळीच्या खालच्या बाजूच्या स्नायूंना म्हणजे पेल्विक फ्लोअर मसल्सना याचा खूप त्रास होतो. त्यावर औषधोपचार न करता महिलांना कीगल पद्धतीचा व्यायाम करण्यास सांगितला जातो. त्यामुळे हे स्नायू मजबूत होतात. सेक्स करताना जवळपास कीगल व्यायामच होतो. त्यामुळे त्या व्यायामाचे सगळे फायदे महिलांना मिळतात आणि त्यांचा खूप फायदा होतो.

१०. सेक्स करा , शांत झोपा
एका संशोधनानुसार मनसोक्स सेक्स करणाऱ्यांना शांत झोप लागते. त्यामुळे तुम्हाला जर निद्रानाश असेल तर बिनधास्त सेक्स करा आणि झोपा. मुळात सेक्सनंतर ऑॅक्सिटॉसिन निर्माण होतं. त्यामुळे आरामाचा फिल मिळतो. त्यामुळे चांगली झोप लागते आणि झोप येत नसल्यामुळे होणारे त्रास कमी होतात. त्यामुळे वजन आणि ब्लडप्रेशरही मेंटेन करण्यात मदत मिळते.
 
Top