पुणे सुपरफास्ट न्युज, मुंबई

 शिवसेना-भाजपामधील शितयुद्ध आता चव्हाट्यावर आलं आहे. उद्या सेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राजकीय पक्षाची पोस्टरबाजी केलीय. त्यामुळे पक्षांतर्गत तणाव निर्माण झाला आहे, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना भवनाजवळ हे ठळक पोस्टर दिसून येत आहे. भाजपविरोधा पोस्टरबाजी झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गर्विष्ठ म्हणून हिणविण्यात आलेय. भाजप, काँग्रेस, मनसे नेते पोस्टरवर हजर आहेत. तर मोदी बाळासाहेबांसमोर झुकतानाचा फोटोही आहे.पोस्टरवर ''विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ'' असा टोला हाणला आहे.
 
Top