पंजाब ( वृत्तसंस्था ) - पंजाबच्या लुधियानातील सतलूज क्लबमधील एका कार्यक्रमात
प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा विनयभंग करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. फोटो काढण्याच्या बहाण्याने एका अधिकाऱ्याने त्यांचा विनयभंग केला. याविरोधात अलका यांनी क्लबच्या व्यवस्थापकाकडे तक्रार दाखल केली आहे.
अलका याज्ञिक या नुकत्याच एका कार्यक्रमासाठी लुधियानातील सतलुज क्लबमध्ये गेल्या होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्या ग्रीन रूममध्ये चेंजिंगसाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक कोणतीही पूर्व कल्पाना न देता क्लबचा एक अधिकारी तेथे गेला आणि त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, फोटो काढण्यास विरोध केल्याने त्याने अलका याज्ञिक यांचा विनयभंग केला. याप्रकरणी अलका याज्ञिक यांनी क्लबच्या व्यवस्थापकाकडे तक्रार नोंदविली असून, ई मेलद्वारे क्लबच्या अध्यक्षांनाही याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे.
 
Top