नागपूर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस)
पथसंचलनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चक्क
संघगणवेशात हजेरी लावली.
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही नागपुरात पथसंचलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
दसऱ्याच्या दिवशी संघ मुख्यालयामध्ये शस्त्रपूजनाचा कार्यक्रम केला
जातो. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवें
द्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी डीआरडीओच्या माजी संचालक विजयकुमार सारस्वत यांनी हजेरी लावली. हे सर्वजण संघाच्या गणवेशात उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमाला संघाच्या गणवेशात उपस्थित राहण्याची ही पहिलाच वेळ आहे.