हैदराबाद  ( पुणे सुपरफास्ट न्युज )  – विजयवाडा-गुंटूर विभागातील ‘अमरावती’ शहराची आंध्रप्रदेशच्‍या नवीन राजधानीचे ठिकाण म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरूवारी या राजधानीची अधिकृत घोषणा करण्‍यासाठी आंध्रप्रदेशात आहेत. सुमारे १८०० वर्षांपूर्वी सातवाहन राजांची राजधानी अमरावती हे शहर होती. आता या शहराला पुन्‍हा राजधानीची नवीन ओळख मिळणार आहे. विजया दशमीच्‍या मुहूर्तावर या राजधानीच्‍या कोनशिलेचा समारंभ सोहळा आयोजित करण्‍यात आल्‍याने. आज सकाळपासून अमरावतीध्‍ये राज्‍यातील मंत्री उपस्‍थित आहेत.‘अमरावती’ असे नवीन राजधानीचे नाव गुंटूर जिह्यातील अमरेश्वर मंदिराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्‍याचा निर्णय या शहराचे ऐतिहासिक, पौराणिक महत्‍त्‍व लक्षात घेऊनच शासनाने घेतला. आज शहराच्‍या पुनर्बांधणीसाठी कोनशिला अनावरण समारंभाचे आयोजन केल्यामुळे नवीन अमरावती कशी असेल या संदर्भात लोकांमध्‍ये कमालीची उत्‍सुकता आहे.
दिड वाजेच्‍या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरूवात केली. त्‍यांनी सुरूवातीला तेलगू भाषेत उपस्‍थितांना अभिवादन केले. मोदी म्‍हणाले, अमरावती आता राजधानी बनत आहे. सरकार आल्‍यानंतर चंद्रबाबू यांनी अत्‍यंत वेगवान काम केल्‍याने मी त्‍यांचे मनपूर्वक अभिनंदन करत आहे. शहरी विकासाची आज वेळेनुसार आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे या विकासाकडे समस्‍येपेक्षा संधी म्‍हणून पाहायला पाहिजे असेही ते म्‍हणाले. त्‍यामुळेच भारत सरकारने १०० स्‍मार्ट सिटी बनवण्‍याचा प्रकल्‍प हाती घेतला, या बाबीचाही त्‍यांनी उल्‍लेख केला.

 
Top