जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
महाराष्ट्राच्या शस्त्र इतिहासतील गाजलेला असा खंडोबा मंदिरातील विशेष
शस्त्र म्हणून असलेला खंडोबाचा खड्ग (खंडा,तलवार ) शेकडो वर्षाचे
चित्तथरारक असलेले हे आयुध खंडोबा अभ्यासक देशी विदेशी पर्यटक यांचे
आकर्षक केंद्र ठरला आहे परंतु राज्याच्या शस्त्र साहित्यातील हा खंडा
सध्या उपेक्षित असून त्याला आता भाविक पर्यटकांना दर्शनाकरिता खुले
करण्याकरिता मेघदडंबरी उभारली जावी अशी मागणीही जयाद्री मित्र परिवार व
खंडा कसरत पटूटू तसेच मल्हारराजे प्रतिष्ठान ,यांच्याकडून केली .
भारतात आयुध शस्त्राना पूज्य स्थानी मानले जाते विशेषता विजयादशमीला
शस्त्र पूजेला विशेष मान असतो असाच जेजुरीचा आगळा वेगळा खंडा बेचाळीस
किलो वजनदार असून या तलवारीला साडे तीनशे वर्ष पूर्वीचा इतिहास लाभला आहे
हे येथील ग्रामस्थांचा जिव्हाळ्या चा विषय असून विजया दशमीच्या दुसर्या
दिवशी या चित्तथरारक महा तलवारीच्या कसरती खंडोबाच्या नावाने केल्या जातात
यात एक हाताने तलवार कित्येक मिनिट उचलून धरण्याचा विक्रम केला जातो तर
चक्क दाताने तलवार उचलून धरणे अशा वेगळ्या अचंब करणाऱ्या थरारक कसरती
केल्या जातात गेल्या काही वर्षात या तलवारचे महत्व केवळ देशभरच नव्हे तर
जर्मनी इतिहास अभ्यासक कै प्रा गुंथूर सोन्थ्यामार यांनी खंडोबा लघुपटा
द्वारे या शस्त्राचे अनोखे महत्व वीस वर्ष पूर्वी विदेशातूनही पसरवले
असून देव दर्शनास येणारे भाविक या तलवारीचे श्रद्धा पूर्वक दर्शन घेतल्या
शिवाय राहत नाही इतकेच काय तर राज्यातील राजकीय तसेच सिने क्षेत्रातील अनेक
महत्वपूर्ण व्यक्तींनी हि तलवार हातात घेऊन तलवारीचे दर्शन घेतले आहे
परंतु हि खंडोबाच्या नवसाला वाहिलेले हे खड्ग तत्कालीन सरदार महिपतराव
पानसे घराण्यांनी ऐतिहासिक कागदपत्राच्या संदर्भ नुसार १७ ६३ ते ६६ च्या
दरम्यान खंडोबा चरणी अर्पित केली आहे असा इतिहास आहे परंतु अश्या देखण्या
भव्य दिव्य अशा तलवारीस ( महाखंडा ) सध्या लोखंडी पत्र्याच्या उभ्या पेटीत
ठेवली जात असते व दसर्याच्या दुस्र्य्दिव्शी कास्र्तीकारिता वापरली जाते
अश्या शस्त्र इतिहासातील आयुध ला हि राजआश्रय मिळणे आवश्यक असून भारतीय
शस्त्रातील वस्तू जोपसना करिता व देश विदेशी पर्यटकांना पाहण्याकरिता खुली
करणायत येऊन त्याकरिता मेघडंबरी उभारणे आवश्यक असल्याचे निष्पन्न होते . ( प्रतिनिधी - विजयकुमार हरीचंद्रे )
